UP Bareilly Fire: बरेलीत झोपडीला लागलेल्या आगीत 4 चुलत बहिणींचा होरपूळून मृत्यू
Fire (PC - File Image)

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात  एक भीषण दुर्घटना घडली आहे. फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवादा बिलसांडी गावात शुक्रवारी दुपारी एका झोपडीला भीषण आग लागली होती. यात चार सख्या चुलत बहिणींचा मृत्यू झाला आहे. तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी होरपळली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या चारही मुली चुलत बहिणी आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून या घटनेबद्दल दुख व्यक्त केले जात आहे.  (हेही वाचा - Train Engine Catches Fire: ओडिशातील जोरांडा रोड स्टेशनजवळ ट्रेनच्या इंजिनला आग, Watch Video)

या आगीत एक महिलाही अडकली होती, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 5 वर्षांची प्रियांशी, 3 वर्षांची मानवी , 5 वर्षांची नयना आणि 6 वर्षांच्या नितूचा या आगीत होरपळून मृ्त्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास यांचे घर नवाडा बिलसंडी गावात आहे. त्याच्या छतावर गवत टाकण्यात आलं होतं, त्याला दुपारी आग लागली होती. हे पेटलेलं गवत झोपडीवर पडलं आणि संपूर्ण झोपडीने पेट घेतला. याच दरम्यान या चार बहिणी झोपडीजवळ खेळत होत्या. अचानक लागल्याने या आगीत या चारही मुली सापडल्या. मुलींनी एकच आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकुन लोकांनी पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चारही मुली गंभीररित्या होरपळल्या होत्या.