Train Engine Catches Fire: ओडिशातील जोरांडा रोड स्टेशनजवळ ट्रेनच्या इंजिनला आग, Watch Video
Train Engine Catches Fire (PC - X/ANI)

Train Engine Catches Fire: ओडिशातील ढेंकनाल (Dhenkanal) जिल्ह्यात गुरुवारी, 22 फेब्रुवारी रोजी एका रेल्वे इंजिनला आग (Fire) लागली. जोरांडा रोड रेल्वे स्थानकाजवळ (Joranda Road Railway Station) घडलेल्या या घटनेमुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. जोरांडा रोड रेल्वे स्टेशन हे ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या खुर्दा रोड रेल्वे विभागांतर्गत कटक-संबलपूर मार्गावरील रेल्वे स्टेशन आहे. घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये रेल्वेच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला आणि धूर निघताना दिसत आहे. इंजिनला आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेत परिसरातील विद्युत कनेक्शन बंद केले. बाधित मार्ग इतर गाड्यांसाठीही बंद करण्यात आला आहे, असे अग्निशमन अधिकारी प्रशांत ढल यांनी सांगितले. (हेही वाचा -Odisha Coromandel Express Accident: ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 50 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी)

ओडिशामध्ये रेल्वे इंजिनला आग -

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान चार गाड्या वापरण्यात आल्या. या घटनेत जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Another Train Derails In Odisha: पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना, ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

गेल्या वर्षी, ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 296 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच सुमारे 1000 प्रवासी जखमी झाले होते. भारतीय इतिहासातील हा दुसरा सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात ठरला होता. ओडिशातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली होती. कोरोमंडल एक्सप्रेस चुकून मेन लाइनऐवजी पासिंग लूपमध्ये घुसली. यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीसोबत समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचे 21 डबे रुळावरून घसरले, त्यातील तीन डबे पुढे येणाऱ्या एसएमव्हीटी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसने लगतच्या ट्रॅकवर धडकले होते.