Another Train Derails In Odisha: पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना, ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली (Watch Video)
Wagons-Train-Derails | (Photo Credits: Twitter/ANI)

ओडिशा राज्यातील बालासोर येथे घडलेल्या रेल्वे अपघाताच्या जखमा अजनही ताज्या असतानाच पुन्हा एकदा दुर्घटना (Train Derails In Odisha) घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, ओडिसा (Odisha) राज्यातील बारगड (Bargarh) जिल्ह्यात एका मालगाडीचे डबे (Goods Train Derailed) रुळावरुन घसरले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मालगाडी आणि त्यातील सामानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासास सुरुवात केली. मदत आणि बचाव कार्यही सुरु झाले आहे.

ओडिशा राज्यातील बरगढ जिल्ह्यातील मेंधापळी येथे ही घटना घडली आहे. रुळावरुन घसरलेली अपघातग्रस्त मालगाडी डुंगुरीहून बारगडकडे जात होती.चुनखडी घेऊन निघालेल्या या मालगाडीला सांबरधराजवळ अपघात घडला. गाडीचे अनेक डबे रुळवरुन घसरले. अधिक माहिती अशी की, चुनखडीच्या खाणी आणि बारगडच्या सिमेंट प्लांट दरम्यान खाजगी नॅरोगेज रेल्वे मार्ग आहे. हे मार्ग लाइन, वॅगन आणि लोको खाजगी असल्याने ते भारतीय रेल्वे प्रणालीशी जोडलेले नाहीत. त्यात मार्गावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

ट्विट

दरम्यान, भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एक, बालासोर जिल्ह्यात एकामागून एक तीन गाड्यां एकमेकांवर आदळल्याने घडलेला अपघात ताजा आहे. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश असलेला हा अपघात कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे 250 किमी आणि भुवनेश्वरच्या 170 किमी उत्तरेस बहनगा बाजार स्टेशनजवळ संध्याकाळी 7 च्या सुमारास झाला. यात 275 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले. तर 900 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवली जात असून, जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.