ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात, शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. एका मालगाडीशी या ट्रेनची धडक झाली व ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात 350 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर, तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. माहितीनुसार, हा अपघात 3 गाड्यांचा होता. चेन्नईकडे जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली व त्याचे सुमारे 10 डबे रुळावरून खाली घसरले. या डब्यांची दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसला टक्कर झाली. यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनही रुळावरून घसरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या या रेल्वे अपघाताबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना वैयक्तिकरित्या बचाव कार्यावर देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: बालासोरच्या बहनगा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला मोठा अपघात; अनेक डबे रुळावरून घसरले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)