Lockdown5 आणि Unlock1 च्या अनुषंगाने पुणे शहरातील नियमावली सोमवारी प्रसिद्ध होणार ; 31 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
May 31, 2020 11:44 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज 31 मे रोजी आपल्या मन की बात (Maan Ki Baat) कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदर्शन व आकाशवाणी वरून केले जाईल. केंद्र सरकार द्वारे कालच लॉक डाऊन 5.0 (Lockdown 5.0) संदर्भात महत्वाचा निर्णय घेऊन देशातील कंटेन्टमेंट झोन्स (Containment Zones) मध्ये 30 जून पर्यंत म्हणजेच आणखीन पुढचा एक महिना लॉक डाऊन कायम ठेवण्याचे घोषित करण्यात आले आहे. या संदर्भात आज मोदी सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या 1 जून रोजी केरळात पाऊस धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानुसार आज पासूनच या भागात पावसाची चिन्हे दिसत आहेत का याचा अभ्यास केला जाईल. काल रात्री हिमाचल प्रदेश मध्ये जोरदार पाऊस झाला होता. तर त्याआधी मुंबईतील काही भागात सुद्धा पावसाने हजेरी लावली होती. केरळात उद्या वेळेत मान्सून दाखल झाल्यास अन्य देशभरात जून च्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून सुरु होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. आज घडीला देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,73,763 आहे. यापैकी सद्य स्थितीत देशात 86,422 रुग्णांवर उपचार सुरु असून 82,370 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत तर कोरोनाचा मृतांचा एकूण आकडा 4971 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाच्या प्रसाराचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रावर दिसून आला आहे. ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रात आज कोरोनाचे तब्बल 65 हजार 168 रुग्ण आहेत.