कोरोना लसीकरणाचा ड्राय रन 2 जानेवारीला देशभर होणार, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड; 31डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 31, 2020 11:18 PM IST
आज नववर्षाची पूर्वसंध्या! अवघ्या काही तासांमध्ये सारं जग 2020 या वर्षाला निरोप देत 2021 चं स्वागत करण्यासाठी सज्ज होणार आहे. 2021 वर्षामधला पहिला दिवस अनेकांसाठी पुन्हा नवी उमेद, आशा, आकांक्षा घेऊन येणारी आहे. मात्र मुंबई सह भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, केरळ या राज्यांत सध्या नाईट कर्फ्यू असल्याने सेलिब्रेशन करण्यासाठी लोकं फार एकत्र जमू शकणार नाहीत. मुंबई पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. गच्चीवरील पार्ट्यांना देखील रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे. त्यांच्यावर ड्रोनने लक्ष ठेवले जाणार आहे.
एकीकडे युके मधून आलेला नवा कोरोनाचा स्ट्रेन आणि अद्यापही भारतात लसीला परवानगी नसल्याने आता स्थिती चिंताजनक बनली आहे. मात्र घाबरून जाऊ नका केवळ दक्ष रहा असं आवाहन प्रशासनाने देशवासियांना केले आहे. भारतात काही राज्यांमध्ये यूकेच्या नव्या स्ट्रेनचा वायरस भारतामध्येही दाखल झालेला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कालच युकेमध्ये ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता भारतामध्येही कोरोना वायरसचा धोका टाळण्यासाठी नवी लस उपलब्ध करून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांतच भारतातही ऑक्सफर्डची कोविशिल्ड उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.