असाममध्ये आज आणखी 380 नव्या रुग्णांची वाढ; 30 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 30, 2020 11:44 PM IST
भारतामध्ये आज शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा यांच्यासोबतच ईद-ए-मिलाद उन नबी चा सण देखील साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या आहेत. ईदचा सण समाजात एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करायला मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पौर्णिमेच्या निमित्ताने आज भारतामध्ये वाराणसी मध्ये भाविकांनी गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. गंगा घाट वर पुजा करण्यासाठीदेखील भाविक मंडळी जमली आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान भारतामध्ये कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. मात्र नव्या रूग्णांचं निदान होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. देशामध्ये आता कोविड 19 टेस्टिंग लॅब आणि क्षमता वाढवल्या आहेत. दरम्यान आता 10.65 कोटी टेस्टिंग झाल्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे टेस्टिंग वाढवलं तरीही नवे रूग्ण वाढीचा दर कमी आहे. भारताचा टेस्ट पॉझिटीव्हीचं प्रमाण आता 7.54% आहे.