अयोध्यामध्ये कोरोना विषाणू चाचण्यांवर भर, भूमिपूजनाचा कार्यक्रम कोविडमुक्त असल्याची खात्री करण्याची आपली जबाबदारी- अयोध्या डीएम; 30 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Jul 30, 2020 11:50 PM IST
भारताभोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus Update) विळखा हा अधिकाधिक घट्ट होत चालला असून दिवसागणिक कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. मात्र आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी भारत केंद्र आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) मिळत आहे. देशात आतापर्यंत 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांनी यशस्वीरित्या COVID-19 वर मात केली असून बरे झाले आहेत. देशात कोरोनाबाधित रूग्णांचा एकूण आकडा काल (29 जुलै) 15 लाख 31 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान भरतातील एकूण मृतांचा आकडा 34 हजार 193 पर्यंत पोहचला आहे.
तर महाराष्ट्रात(Maharashtra) काल दिवसभरात 9,211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 298 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या 4,00,651 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या 2,39,755 जणांचा, प्रत्यक्ष रुग्णालायत उपचार सुरु असलेल्या 1,46,129 रुग्णांचा आणि आजवर कोरोनामुळ मृत्यू झालेलया 14,463 रुग्णसंख्येचाही समावेश आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
याचबरोबर (Monsoon Update) महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठ वाडा च्या काही भागात जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याचबरोबर येत्या 24/48 तासात मुंबई आणी किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभाग प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.