जम्मू-काश्मीर: अनंतनाग पोलिसांनी अटक केलेले दोन दहशतवादी 'लष्कर-ए-मुस्तफा' चे ; 30 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 30, 2021 11:40 PM IST
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची चर्चा सुरू आहे. आज राज्यातील सर्व मंत्र्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी अण्णांनी अचानक आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अण्णांचा भाजप पक्षाला पाठिंबा तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातचं आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी 2771 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 2613 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 1925800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 43147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.28% झाले आहे.