Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

अंदमान निकोबारमध्ये आज कोरोनाच्या 23 प्रकरणांची नोंद; 30 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Aug 30, 2020 11:38 PM IST
A+
A-
30 Aug, 23:38 (IST)

अंदमान निकोबारमध्ये आज कोरोनाच्या 23 प्रकरणांची नोंद झाली असून, एकूण प्रकाराने 3,104 झाली आहेत. यामध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या  473  सक्रीय रुग्ण आहेत.

30 Aug, 23:04 (IST)

हैदराबाद मध्ये तेलंंगणा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बीबी का आलम' मुहर्रम मिरवणुकीत सोशल डिस्टंंसिंग फाट्यावर बसवत लोकांंनी गर्दी केल्याचा व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहे.

30 Aug, 22:48 (IST)

पुण्यातून एनडीआरएफच्या चार पथकांसह 21 कर्मचारी आणि 3 बोटी नागपुरात दाखल झाल्याची माहिती गृहमंंत्री अनिल देशमुख यांंनी दिली आहे. हे कर्मचारी  भंडारा आणि ब्रह्मपुरी येथे बचाव व पुनर्वसनासाठी निघाले आहेत. एसडीआरएफची टीमही बोटी घेऊन भंडाराकडे रवाना झाल्या आहेत. मध्य प्रदेश येथुन धरणाचे दरवाजे उघडल्याने या भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

30 Aug, 22:28 (IST)

दिल्ली - जेईई परीक्षा देणाऱ्या 17 वर्षाच्या व्यक्तीने आज देशातील कोविड-19 आणि पूर लक्षात घेऊन नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याच्या विनंती करत, मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांना पत्र पाठविले.

30 Aug, 21:56 (IST)

पुणे शहरात नव्याने 1,658 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 94,497 झाली आहे. तर 1,502 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 15,544 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 4,45,759 झाली असून आज 5,713 टेस्ट घेण्यात आल्या.

30 Aug, 21:29 (IST)

ओडिशा: हिराकुड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे संबलपूर शहराच्या सखल भागातील सुमारे 2 हजार लोकांना पूर मदत केंद्रात हलविण्यात आले आहे.

30 Aug, 21:18 (IST)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,237 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,44,626 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 851 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,16,351 रुग्ण बरे झाले आहेत.

30 Aug, 20:54 (IST)

महाराष्ट्रात  कोरोनाचे आणखी 16,408 रुग्ण आढळून आले तर 296 जणांचा बळी गेला आहे. 

30 Aug, 20:40 (IST)

पालघर जिल्ह्यात 24 तासात आणखी 274  कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

30 Aug, 20:20 (IST)

रायगड मधील करकट भागात पोलिसांचा जुगाराच्या गुहेत धाड टाकत 45 जणांना ताब्यात घेतले आहे.

Load More

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशवासिय ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा कार्यक्रम आज होणार आहे. या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते गेली कित्येक वर्षे देशवासियांशी संवाद साधत आहे. आज या कार्यक्रमाचा 68 वा भाग प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात देशाची सद्य परिस्थिती, लॉकडाऊन (Lockdown), अनलॉक (Unlock), आर्थिक परिस्थिती या सर्वांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच हा लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असून याबाबत काय महत्त्वाची घोषणा करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या देशवासियांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे संपूर्ण देशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या चार दशकांच्या तुलनेत देशात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,64,281 वर पोहचली आहे. तसेच काल दिवसभरात तब्बल 328 जणांंची कोरोनाच्या विरुद्ध झुंंज अपयशी ठरली परिणामी राज्यातील कोरोना बळींंचा आकडा (Coronavirus Deaths)  24,103 इतका झाला आहे.


Show Full Article Share Now