Ambarnath News: अंबरनाथमध्ये पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शहरातील जांभूळ गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. तीन कर्मचाऱ्यांना विजेचा जोरात झटका लागला. यात त्यांचा मृत्यू (death) झाला. (हेही वाचा- भिवंडीत 14 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथईल जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम करायचे होते त्यामुळे तीन कर्मचारी गावात आले. कामाला सुरुवात केली परंतु टाकीचे पाणी उपसण्यासाठी मोटारची व्यवस्था केली. पाणी उपसण्याचे काम सुरु असताना पाणी उपसा करणाऱ्या मोटारमधून विद्यूत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा जोरात झटका लागला. ज्यात ते तिघेही खाली बसले.
गावकऱ्यांनी तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल या तिघांचा विजेचा धक्का लागला आणि मरण पावले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतली असून त्यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या घरांच्याना घटनेची माहिती दिली.