Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Child Dies of Electric Shock in Bhiwandi: भिवंडीत (Bhiwandi) बुधवारी सायंकाळी पॉवरलूम युनिटच्या छतावर चढत असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू (Death) झाला. मृत दिलशत हमीदुद्दीन शाह हा भिवंडीतील एका उर्दू शाळेतील आठवीचा विद्यार्थी आहे. बुधवारी दिलशत पॉवरलूम युनिटच्या छतावर मृतावस्थेत आढळून आला. एका रहिवाशाने तो सापडल्यानंतर परिसरातील लोकांना सतर्क केले. तसेच यासंदर्भात पोलीस आणि वीज पुरवठा कंपनीला माहिती दिली. त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

मुलाला भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मुलाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. प्रथमदर्शनी, तो पॉवरलूम युनिटच्या छतावर कोणत्या कारणासाठी चढला हे अद्याप अस्पष्ट आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Child dies of Electric Shock in Pune: वीजेचा धक्का बसून बालकामगाराचा मृत्यू, पुण्यातील घटना)

छतावरील वीजेच्या ताराच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला. शांतीनगर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली आहे. शांतीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश घोडके म्हणाले, प्रथम दृष्टया, मुलाचे डोके व पायाला भाजले होते. परिणामी त्यांच्यावर काळे डाग पडले होते. तपासादरम्यान असे समजले की शॉकचा आघात खूप जास्त आणि तीव्र होता. ज्यामुळे तो छतावर पडला. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, नोएडा येथील धक्कादायक घटना)

पोलिसांनी सांगितले की मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबातील सदस्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मृत दिलशत भिवंडीतील रामनगर परिसरात आठ भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून दिलशतच्या कुटुंबियांवर त्याच्या मुत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.