1998 साली देशात अनेक ठिकाणी बॉम्ब-स्फोटांचा कट रचल्याचा आरोपातून अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता; 3 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Mar 03, 2020 11:09 PM IST
आज, 3 मार्च पासून महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये घेतली जाणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 9,75,894 विद्यार्थी तर 7,89,898 विद्यार्थीनी आहेत.
दुसरीकडे,काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सहित सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहोत आणि याबाबत आपण येत्या रविवारी आपला निर्णय मांडणार आहोत असे ट्विट केले होते,यावरून आजही सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. मोदींच्या या निर्णयाच्या बाबत सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी मंडळींपर्यंत सर्वच याबाबत तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. तसेच मोदींच्या पाठोपाठ आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दरम्यान, आज 3 मार्च रोजी दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्यातील दोषींना दिली जाणारी फाशी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे, दोषी पवन कुमार गुप्ता याची दया याचिकेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अजूनही निर्णय देण्यात आली नसल्याने दिल्ली पटियाला कोर्टाकडून या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या वरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे