Live
असाममध्ये एकूण 1 हजार 830 कोरोनाबाधित; दिवसभरात 74 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 3 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jun 03, 2020 11:37 PM IST
कोरोना व्हायरस संकटासह भारतावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आज रायगड, पालघर, मुंबई, ठाणे या भागांना बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामध्ये वार्याचा वेग हा 100-110 kmph ते 120kmph पर्यंत असेल. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून एनएडीआरएफच्या टीम्स चक्रीवादळाचा धोका असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दुपारी 1 च्या सुमारास धडकेल, असा अंदाज आहे.
दरम्यान कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची वाढ देशासह महाराष्ट्रात कायम आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 198706 वर पोहचला असून त्यापैकी 95527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप 97581 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 5598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असला तरी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहेत. अनलॉक 1 च्या माध्यमातून विविध टप्प्यात सोयी-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत.