झारखंडमध्ये आज 618 नवे कोरोनाबाधित रुग्ण ; 3 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Aug 03, 2020 11:50 PM IST
आज, देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2020) सण साजरा केला जाणार आहे. याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंंद (President Ramnath Kovind) यांंनी सुद्धा ट्विट च्या माध्यमातुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात आजच्या दिवशी कोळी बांधवांंचा महत्वाचा दिवस नारळी पौर्णिमा (Narali Purnima) देखील साजरा होईल. मात्र यावर्षी समुद्र किनार्यावर न जाता सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Monsoon Update) मुंबई हवामान विभागाचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांच्या माहिती नुसार आज मुंबई सह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसतील मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे असे, जोरदार पावसासाठी आता थोडी वाट पाहावी लागणार आहे असेही होसाळीकर यांनी म्हंटले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, काल गृहमंत्री अमित शाह व कर्नाटकचे मुख्यमंंत्री बी. एस. येडियुरप्पा यांंना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांची ही प्रकृती सध्या स्थिर असली तरी खबरदारी म्हणून त्यांना हॉस्पिटल मध्ये निरिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.