चेन्नई कस्टमने सोमवारी 4 लाख किंमतीचे अमली पदार्थांच्या एमडीएमएच्या 100 गोळ्या जप्त केल्या आहेत. ट्वीट-

 

राज्यात, उत्तर महाराष्ट्रात 5, 6 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. ट्विट-

 

काबुल युनिव्हर्सिटीवर करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उत्तराखंड येथे शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 18 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये काल हैदराबादमधील एका 37 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

राजस्थानच्या गृह विभागाने  दिवाळीनिमित्त फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. राज्यात 31 डिसेंबर 2020 पर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ट्विट-

  

वंदे भारत मिशन अंतर्गत वुहान येथे गेलेल्या 19 प्रवाशांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह  आली आहे.

दिल्लीत कोरोनाचे आणखी 4001 रुग्ण आढळले असून 42 जणांचा बळी गेला आहे.

दिल्लीतील वातावरण आज 10.8 अंश सेल्सिअसवर पोहचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

पालघर येथे कोरोनाचे आणखी 63 रुग्ण आढळल्याने आकडा 38 हजार 935 वर पोहचला आहे.

Load More

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या सर्वातून देश हळूहळू बाहेर पडतो आहे. देशाची अर्थव्यवस्था अल्पशा प्रमाणात का होईना. परंतू, सावरताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात याचे काहीसे संकेत सकारात्मक मिळाले. होय, गेल्या आठ महिन्यांमध्ये सातत्ताने निचांक दाखवणाऱ्या वस्तू सेवा कर (जीएसटी) ने ऑक्टबर महिन्यात प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा उच्चांग गाठला. हा उच्चांक गेल्या आठ महिन्यांतील एकूण जीएसटीच्या 10% अधिक आहे. अर्थात हा उच्चांक म्हणावा तितका अपेक्षीत नसला तरी काहीतरी सकारात्मक बदल होतो आहे, हे सांगण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

केंद्रासोबतच राज्यातही वस्तू सेवा कराबाबत दिलासादायक चित्र आहे. दसरा संपला आता दिवाळी तोंडावर आहे. राज्यात असलेल्या सण, उत्सव काळात राज्यातील जीएसटी महसूल वाढतो आहे. त्यामुळे राज्याला भासणारी आर्थिक टंचाई लवकरच कमी होईल अशी आशा आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जीएसटी बऱ्यापैकी वाढला. ही वाढ साधारण 2,200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे ही वाढ आता 15,799 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आलेले मळभ हटून अर्थव्यवस्था आता पठरीवर येत असल्याचेच हे काहीसे चिन्ह आहे.

दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला खेरेदी करायची असेल तर थोडे आजूबाजूला पाहा. घर, मोटार, सोने-चांदी यांसह कपडे, फ्रीज, वॉशिंगमशीन, टीव्ही, मोबाईल, फर्निचर, दुचाकी, यांच्यासह दिवाळी अंक आणि इतर अनेक वस्तूंसाठी अनेक मॉल्स आणि दुकाने आणि व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर सवलतींची खैरात सुरु केली आहे. या सवलतींचा आनंद आपण आपल्या खिशातील बजेटनुसार नक्कीच घेऊ शकता.

दरम्यान, विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या आणि प्रदीर्घ काळ चर्चेत असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्य सरकार राज्यपालांकडे आज शिफारस करण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे (गायक), यशपाल भिंगे (धनगर समाजाचे नेते), काँग्रेस पक्षाकडून रजनी पाटील (सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय), सचिन सावंत (पक्षप्रवक्ते), मुझफ्फर हुसेन (माजी आमदार, अल्पसंख्याक), अनिरुद्ध बनकर (कलाकार) यांच्या नावांची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. लवकरच शिवसेनेची नावेही पुढे येतील.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.