Live
दिल्ली-लखनऊ आणि मुंबई-अहमदाबाद या तेजस एक्स्प्रेस गाड्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा धावतील; 29 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Jan 29, 2021 11:18 PM IST
केंद्र सरकारचं अर्थसंकल्प अधिवेशनाला आजपासून दिल्लीमध्ये सुरूवात होत आहे. दरम्यान आज आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल 2020 सादर केला जाणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. विरोधकांनी मात्र आज बजेट पूर्वीच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कायदे चर्चेविना परित केल्याने आणि शेतकर्यांना अपेक्षित चर्चा होत नसल्याने आता विरोधकांनी शेतकर्यांना पाठिंबा दर्शवत अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.
अधिवेशन सुरू असताना आता किसान आंदोलनामुळे सुरक्षा व्यवस्था सीमाभागात चोख करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी शेतकऱ्यांना हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काल गाझीपूर सीमेवर तणाव निर्माण झाला. मात्र, कोणत्याही स्थितीत शेतकरी गाझीपूर सीमेवरून मागे हटणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. ते मीडीयाशी बोलताना काही काळ भावूक देखील झाले होते.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गाझीपूर बॉर्डरवर मात्र पोलिसांचा फौजफाटा असला तरीही जागा रिकामी करणार नाही असं ठणकावून सांगत अनेकांनी 'जय जवान जय किसान' अशा घोषणा दिल्या आहेत. काही शेतकरी संघटनांनी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणानंतर या आंदोलनातून माघार घेतली आहे.