भांडूप येथे कपड्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी नाही, आग विझविण्याचे प्रयत्न सुरु ; 28 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jan 28, 2021 11:18 PM IST
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. त्यामुळे ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व गदारोळ आणि तणाव पाहायला मिळाला. या सर्व प्रकारानंतर आता देशाच्या संसदेवर 1 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा नियोजित शेतकरी मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनातही फूट पडल्याचे चित्र आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी माघार घेतली आहे.
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले शेतकरी कायदे मागे घेण्यासाठी देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेले 2 महिन्यांहून अधिक काळ हे शेतकरी उन, वारा, पाऊस, थंडी यांचा काहीही विचार न करता सिंघु सीमेवर ठाण मांडून आहेत. केंद्र सरकार आणि हे शेतकरी यांच्यात आतापर्यंत 12 वेळा चर्चा झाली आहे. परंतू प्रत्येक वेळी चर्चा निष्फळ ठरताना दिसत आहे.
दरम्यान, दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 37 नेत्यांविरोधात गुन्हे दाखल जाले आहेत. तर ,19 जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्व प्रकारानंतर आता आंदोलनाचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी घातलेल्या कडक बंधनांमधून महाराष्ट्र हळूहळू सुटत आहे. केंद्र सरकारने नुकतीच नव्याने आदेश काढत कोरोना निर्बंधांना शिथिलता दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे अधिक प्रमाणावर खुली करण्याची परवानगी आहे. तर, जलतरण तलाव सर्वांसाठी खुले करण्यासही केंद्राने मान्यता दिली आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनासोबतच शेती, क्रीडा, साहित्य, समाज, संस्कृती, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, उद्योगविश्व, इंटरनेट, डिजिटल वर्ल्ड आणि इतर क्षेत्रातील घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.