मुख्यमंत्री एम. एल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणा मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. दरम्यान आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या घरी परत जाण्याचे आवाहन केले आहे. ट्विट-

 

दिल्लीतील आंदोलनशील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संबोधल्याबद्दल कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये कर्नाटकचे राज्यमंत्री बी.सी. पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

 

आजच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान द्वारका जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात मोहन गार्डन पोलिस स्टेशनच्या एसएचओसह 30 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भात तीन एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.

दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता धौला कुआं ते नरैना पर्यंत वाहतूक सुरुळीत झाली असल्याची माहिती दिल्ली ट्राफिक पोलिसांनी दिली आहे. ट्विट-

 

देशातील जवळजवळ 20.39 लाख हेल्थवर्कर्सला लस दिली गेल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

ट्रॅक्टर परेडमध्ये 83 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 2405 रुग्ण आढळले असून 47 जणांचा बळी गेला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री लाल खट्टर यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे राज्यासाठी हाय अलर्टचे आदेश दिले असून नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी DGP यांना निदर्शन दिले गेले आहेत.

आंदोलक शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बॅरिगेट्सला धडकल्याने मृत्यू झाला आहे.

Load More

आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र देशभर उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलिब्रेशनवर कोरोना वायरसचं सावट आहे. त्यामुळे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दिल्लीच्या राजपथावर आज नियोजित कार्यक्रमांनुसार, ध्वजवंदन, चित्ररथ आणि परेड होणार आहे. मात्र यंदाचा सोहळा हा परदेशी पाहुण्यांशिवायच पार पडणार आहे.

आज दिल्ली मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासोबतच मागील 2 महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली देखील आहे. त्यामुळे त्याकडेही सार्‍यांचे लक्ष लागलेले आहे. नक्की वाचा: Republic Day 2021 Rangoli Designs: प्रजासत्ताक दिनानिमित्त काढा 'या'सोप्या आकर्षक आणि Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स .

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान आज भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर मधील या अपघातामध्ये 2 वैमानिक जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा जखमी आहे.