लोअर परेल मधील सन मिल कम्पाउंटमध्ये आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल ; 25 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Nov 25, 2020 11:57 PM IST
भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट मोठं स्वरूप घेऊ नये म्हणून त्याला वेळीच रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालं आहे. दरम्यान आज (25 नोव्हेंबर) पासून दिल्ली, राजस्थान, गोवा,गुजरात मधून महाराष्ट्रात येणार्यांसाठी कडक नियमावली आहे. आता या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्यांना त्यांचा कोविड चाचणीचा आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान मार्गे या तिन्ही साठी हा नियम लागू असणार आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी नाकाबंदी वाढवत टेस्टिंगची चोख सेवा वाढवली आहे.
दरम्यान आज सकाळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोना वायरसचा संसर्ग झाला होता. या आजाराशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अहमद पटेल हे कॉंग्रेसचे चाणाक्य म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 36वा स्मृतिदिन आहे. कराड मधील त्यांच्या प्रीतिसंगम स्मृतिस्थळावर जाऊन कॉंग्रेस नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.