ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील Sacred Heart Cathedral मध्ये रोषणाई
Delhi: Sacred Heart Cathedral illuminated on the eve of #Christmas pic.twitter.com/XMICkkIPXq
— ANI (@ANI) December 24, 2020
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील Sacred Heart Cathedral मध्ये रोषणाई; 24 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रमाणात सध्या बरीच घट होत असलेली दिसून येत आहे. काल राज्यात 3913 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व 7620 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण 54,573 संक्रमित रुग्णांवर उपचार चालू आहेत. यासह राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.51% झाले आहे.
दुसरीकडे ब्रिटनमधील नवीन कोरोना विषाणू स्ट्रेनमुळे चिंता वाढल्या होत्या मात्र आता अवघ्या आठवड्याभरात युकेमध्ये कोरोनाचा अजून एक नवा स्ट्रेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा नवीन स्ट्रेन पहिल्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नाताळ सण साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
Mumbai Lake Water Levels: मुंबईचा पाणीसाठा 95.89 टक्क्यांवर; साठा समाधानकारक पातळीवर
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 95.84% साठा
PayPal Layoffs: PayPal कडून भारतात सुमारे 600 कर्मचाऱ्यांची कपात
Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.94% पाणीसाठा