उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली आढावा बैठक ; 23 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Oct 23, 2020 11:45 PM IST
मुंबईतील नागपाडा भागातील सीटी सेंटर मॉलला काल रात्री आग लागली. ही आग लेव्हल-5 ची होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु होते. मात्र यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
देशात सध्या बिहार निवडणूकांचे वारे वाहत आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचा दौरा करणार आहेत. यासाठी सासाराम मधील बियाडा मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे. 27 ऑक्टोबर रोजी बिहार निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात राजकारणात सध्या एकनाथ खडसे यांची चर्चा आहे. भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचे संकट देशात कायम आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश येत आहे. सध्या देशात 7706947 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 6874519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 715812 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत 116616 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. येणारा पुढील काळ सणासुदीचा असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.