पुणे: हडपसर भागात रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया केंद्राला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरु ; 23 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 23, 2021 11:25 PM IST
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Founder Balasaheb Thackeray) यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाज आज आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्सहात साजरी होत आहे. केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ (Parakram Diwas) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाताच्या एल्गिन रोड येथील नेताजी भवनाला भेट देणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, सध्या कोरोना लसीसंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, कोरोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.