नागपाडा येथील मॉलला लागलेली आग ही Level-3 असल्याचे जाहीर करण्यात आले असून 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; 22 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 22, 2020 11:14 PM IST
राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल पाठोपाठ आता महाराष्ट्रानेही राज्यात परस्पर सीबीआय तपासाला बंदी घातली आहे. महाविकास आघाडी सरकारने आता केलेल्या नियमबदलानुसार, राज्यांत जर सीबीआयला तपास करायचा असेल तर त्यासाठी सरकाराची परवानगी घेणं गराजेचे असेल.
दरम्यान भारतामध्ये सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे. कोरोनाच्या सावटामुळे त्याच्या सेलिब्रेशनवर बंधनं असली तरीही नागरिक सावधपणे हा सण साजरा करत आहेत. आज षष्ठी म्हणजे सहावा दिवस असल्याने आता नवरात्रीमध्ये दुर्गापुजेचा उत्सवदेखील सुरू झाला आहे. पश्चिम बंगालसह राज्यभर दुर्गा मातेचं रूपन पुढील 4 दिवस केले जाईल.
देशासह महाराष्ट्रातही आता कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. यामध्ये मुंबईतही कोरोना रूग्ण दुपटीचा दर 100 दिवसांच्या पार गेला आहे. त्यामुळे सर्वत्र आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत असताना दिसत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
यंदा ऐन ऑक्टोबरमध्येही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी बाहेर पडणार आहेत.