जम्मू काश्मीर मध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा सुरु राहणार- रोहित कन्सल; 22 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Mar 22, 2020 11:37 PM IST
कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू झालेल्या युद्धामध्ये आज (22 मार्च) चा दिवस भारतीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार देशभर कडकडीत बंद अर्थात 'जनता कर्फ्यु' ला सुरूवात झाली आहे. मुंबई, पुणे सह देशभरात अनेक राज्यातील शहरांमध्ये लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्येही नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार आता 31 मार्च पर्यंत सामान्यांना अतिमहत्त्वाचे काम न नसल्यास बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये आता केवळ अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी काम करताना दिसतील. तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील 29 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. Coronavirus च्या भीतीने घरी परतणाऱ्या लोकांना पीएम नरेंद्र मोदी यांचा प्रवास न करण्याचा सल्ला; ‘शहरे सोडू नका, आहे तिथेच रहा’.
जगभरात वाढत असलेला कोरोनाचा विळखा तोडण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा एक महत्त्वाचा खबरदारीचा पर्याय आहे. त्यानुसार आता नागरिक स्वतःहून घरी बसण्याचा निर्णय घेत आहे. मात्र या काळात हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स, दूध, अन्नधान्य आणि बॅंक सुरू राहणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 317 वर पोहचला असून पुढील दोन आठवडे भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण संयम आणि संकल्प ठेवून वागल्यास भारताचा कोरोना व्हायरसविरूद्धचा लढा यशस्वी ठरू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत नागरिकांना या 'वॉर व्हर्सेस व्हायरस' मध्ये एकजुटीने उभं राहण्याचं कळकळीचं आवाहन केले आहे.