राजधानी दिल्लीच्या उत्तम नगर भागात आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 15 गाड्या पोहोचल्या आहेत.

शेतकरी आंदोलन विस्कळीत करण्यासाठी एजन्सीमार्फत प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शेतकरी नेते कुलवंतसिंह संधू यांनी केला आहे.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील मोती नगर भागात एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर आरोपींनी पीडिताला या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एसपी अतुलसिंग यांनी दिली आहे. ट्विट-

  

आता पुण्यात चारचाकी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या कुटूंबासाठी मास्क घालणे अनिवार्य नाही. प्रवासी वाहनांसाठी (जसे की OLA, UBER) आणि दुचाकींवर मास्क घालणे अनिवार्य राहील. पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचे परिणाम सकारात्मक आले आहेत. लसीने उच्च सुरक्षा, रोगप्रतिकारक शक्ती दर्शवली आहे. लॅन्सेट जर्नलमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

ट्विटरने इराणचे सर्वोच्च नेते Ayatollah Ali Khamenei यांचे ट्विटर खाते निलंबित केले. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे.

गुजरातमध्ये आज 451 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,58,264 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात 4,374 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्या मंत्रालयाने माहिती दिली आहे.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाताच्या एल्गिन रोड येथील नेताजी भवनाला भेट देणार आहेत.

 

महाराष्ट्रात आज 2,779 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 3,419 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मध्य प्रदेशः 22 फेब्रुवारी ते 26 मार्च या कालावधीत राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

Load More

महाराष्ट्रात पुण्यातील मांजरी भागात असलेल्या सीरम इन्स्टिट्युटच्या प्लांटला लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 च्या सुमारास त्या ठिकाणी भेट देणार आहेत. दरम्यान कोविड 19 लस कोविशिल्ड या मध्ये सुरक्षित असल्याची माहिती सीरम कडून देण्यात आली आहे. आज कोविशिल्ड लसीचा म्यानमारला पहिला साठा पहाटे रवाना झाला आहे.

महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकार मधील कॅबिनेट नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणार्‍या महिलेने ती तक्रार मागे घेतली आहे. तशी माहिती तिने पोलिसांना देखील कळवली आहे.

कर्नाटकाच्या शिवमोगा जिल्ह्यातील उनासोंडी येथील दगड खाणीत काल एक भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये जिलेटीनच्या कांडयांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात आठ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

अमेरिकेत जो बायडन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर आता त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत मास्क घालणं आपल्यासाठी आवश्यक असल्याचा तज्ञांचा सल्ला आहे अशी माहिती दिली आहे. तसेच यामुळे आपण 50 हजार अधिक लोकांना सुरक्षित ठेवू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त करताना पुढील 100 दिवसांसाठी मास्क घाला असं आवाहन केले आहे.