इटली मध्ये आणखी 627 कोरोना ग्रस्त रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा 4000 हून अधिक- AFP वृत्तसंस्था; 20 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Mar 20, 2020 11:12 PM IST
2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना आज सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात आली. यापूर्वी अनेक कारणांमुळे या चौघांच्या फाशीच्या शिक्षेला दिरंगाई होत होती. मात्र आज अखेर त्यांना फासावर लटकवण्यात आले आणि निर्भयासह तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. यानंतर सर्वच स्तरातून विजयोत्सव साजरा केला जात आहे. (निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी)
कोरोना व्हायरसने भारत देशात शिरकाव केला असून 169 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मात्र कोरोना व्हायरसने भीषण रुप धारण करु नये म्हणून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार, 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू असणार असल्याचे काल (19 मार्च) जनतेला संबोधित करताना सांगितले. जनात कर्फ्यू मध्ये सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे मोदींनी देशवासियांना आवाहन केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित 48 रुग्ण असून नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. तसंच हा महाराष्ट्र शिवरायांचा असून लढवय्या आहे असे म्हणत त्यांनी देशभरातील गंभीर स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या जनतेचे मनोबल वाढवले.