मुंबई: सकाळी 5 ते संध्याकाळी 7 दरम्यान, घरा शेजारच्या मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारिरीक व्यायाम करण्यास परवानगी; 2 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Jul 02, 2020 11:55 PM IST
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा मजबूत होत चालला असून दिवसागणिक कोविड-19 (COVID-19) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहराता असून त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे, पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. यामुळे असे असताना देखील या भागातील अनेक लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. याचा परिणाम ठाण्यामध्ये 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन (Thane) ठेवण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आजपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. या कडक लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे.
देशातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. महाराष्ट्रात अनलॉक 2 सुरुवात झाली असून लोकांनी संयम बाळगून सोशल डिस्ंटसिंगचे पालन करावे असे सांगण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 80 हजार 298 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तर भारतामध्ये कोरोनाबाधितांनी 5 लाख 85 हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज 1 जुलै ला 18,653 नवे कोरोनाबाधित रूग्ण तर 507 रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.