येत्या 1 ऑक्टोंबरपासून लागू होणार रेस्टॉरंटच्या बिलासाठी नवा नियम, मान्य नसल्यास केली जाणार कठोर कार्यवाही
Representational Image (Photo Credits: Flickr)

फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI ने येत्या 1 ऑक्टोंबर पासून खाद्य पदार्थांसंबंधित सर्व दुकानदारांना रजिस्ट्रेशन करण्याचे निर्देशन दिले आहेत. तर 1 ऑक्टोंबर नंतर अशा दुकानदारांवर कार्यवाही केली जाणार जे ग्राहकांना बिलावर FSSAI चा रजिस्ट्रेशन क्रमांक देणार नाहीत. फूड सेफ्टी ऑफिसर यांच्याकडे दुकान बंद करुन त्याच्या मालकाच्या विरोधात कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे हक्क त्यांच्याकडे असणार आहेत. यामध्ये तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा होऊ शकते.

FSSAI ने आदेश दिले आहेत की, आता ऑक्टोंबर महिन्यापासून रेस्टॉरंट आणि मिठाईच्या दुकानांसह अन्य खाण्यापिण्याच्या दुकांना प्रथम FSSAI चे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर दुकानाच्या बाहेर एक डिस्प्ले बोर्ड लावत, वापरण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार एखाद्या पद्धतीचे तूप वापरत असत तर ते कोणत्या पद्धतीचे आहे किंवा अन्य सामानाची सुद्धा माहिती डिस्प्ले करावी लागणार आहे. रोगप्रतिकारक क्षमेतेला धोकादायक असणाऱ्या गोष्टीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे.(Work From Home बंद, अनेक कंपन्यांकडून Work From Office सुरु, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामासाठी कार्यालयात बोलावले)

आता FSSAI क्रमांक हा पॅकेज फूड लेबलवर लिहिणे किंवा दाखवणे अनिवार्य असणार आहे. मात्र ही समस्या खासकरुन रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने, कॅटर्स किंवा किरकोळ दुकान यांना येते. कोणत्याही फूड बिझनेस ऑपरेटरचा 14 डिजिटचा FSSAI क्रमांक बिलावर सहज दिसत किंवा उपलब्ध करुन दिला जात नव्हता. यामुळे ग्राहकांना फूड बिझनेस ऑपरेटच्या विरोधात तक्रार करण्यास समस्या येत होती. यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

जर तुम्हाला सुद्धा रेस्टॉरंट किंवा खाण्यापिण्याच्या दुकानातील सामानाची तक्रार करायची असेल तर तुम्ही FSSAI च्या पोर्टलवर जाऊन करु शकता. onlinelegalindia.com/services/consumer-complaint/ येथे भेट देत ही तक्रार करता येते. तुम्हाला मात्र नाव, मोबाइल क्रमांक, मेल आयडी, राज्य आणि किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती द्यावी लागणार आहे.