Work From Home बंद, अनेक कंपन्यांकडून Work From Office सुरु, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामासाठी कार्यालयात बोलावले
Work From Home | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीचे संकट काहीसे कमी होताना दिसत आहे. त्यामुळे देशही या संकटातून हळूहळू सावरतो आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आता Work From Home संकल्पना बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावणे सुरु केले आहे. त्यामुळे लवकरच 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना बंद होऊन पुन्हा एकदा ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची लगबग वाढणार आहे. वर्क फ्रॉम ऑफीस पुन्हा एकदा सुरु करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रोक्टर एंड गैंबल (Procter & Gamble), विप्रो (Wipro), एचडीएफसी (HDFC), एक्सिस बैंक (Axis Bank), यस बैंक आणि डेलाइट (Daylight) या कंपन्यांचा समावेश आहे. या प्रमुख कंपन्यांसह इतरही अनेक छोट्यामोठ्या कंपन्या पाठीमागील दीड-वर्षांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. मात्र, आता कोरोचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहून या कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलावण्याचा विचार करत आहेत.

कोरोना महामारी संगटामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work from Home) ट्रेंड सुरु केला. दरम्यान, लॉकडाऊन हटला परंतू, कोविड-19 संसर्गाची भीती अद्यापही कायम होती. मात्र हळूहळू ती भीतीही कमी होत आहे. त्यामुळे या कंपन्या पुन्हा एकदा ऑफीस पूर्ववत सुरु करण्याचा विचार करत आहेत. (हेही वाचा, Work From Home: 'वर्क फ्रॉम होम' दरम्यान जगभरात हॅकींगच्या प्रमाणात वाढ)

वर्क फ्रॉम होम बाबत अनेकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होम प्रणालीत काम करताना अडचण जाणवत आहे. तर काहींना वर्क फ्रॉम होम ही संकल्पाना अत्यंत सुंदर वाटत आहे. काही कंपन्या अशा आहेत की त्यांनी कर्मचाऱ्यांना सवलत दिली आहे. पुढील काही महिने ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑफिसला यावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरुनच काम करावे.

काही किंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यासोबतच देशातील कोरोना संक्रमितांच्या संख्येतही बरीच घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसला यावे अशी भूमिका काही कंपन्यांनी घेतली आहे. काही कंपन्या टप्प्या टप्प्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवणार आहेत.