मुख्यमंत्र्यांनी आज केवळ 3800 रुपयांचे चेक देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली - निलेश राणे ; 19 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Oct 19, 2020 11:54 PM IST
महाराष्ट्राला मागील आठवड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कोकणातील अनेक गावांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी आलेल्या पावासाने शेतात तरारलेलं पीक आडवं झोपलं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तभागांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते बाहेर पडले आहेत. आज (19 ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. 2 दिवस ते विविध ठिकाणी भेट देणार आहेत. दरम्यान शरद पवार, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार देखील विविध भागात नुकसानीचा आढावा घेत आहेत.
महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा कमी होत असताना आता हळूहळू पुन्हा व्य्वहार सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा सुरू केली जात आहे. मर्यादीत आसनक्षमतेसह आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी घेत मुंबई मेट्रो पुन्हा धावणार आहे. दिवसभरात मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील तर एका वेळी केवळ 360 प्रवासी प्रवास करणारआहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. राज्यात मंदिरं दर्शनासाठी खुली केलेली नसली तरीही लोकांना यंदा नवरात्रीपासून पुढील सारेच सण सावधतेने सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन दर्शन सेवा सुरू आहे.