Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago
Live

पुण्यात आज 193 नव्या रुग्णांची नोंद; 10 जणांचा मृत्यू; 19 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | May 19, 2020 11:21 PM IST
A+
A-
19 May, 23:20 (IST)

महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 193 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

19 May, 22:45 (IST)

1 जून पासून दररोज 200 नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत, असं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं आहे.

 

19 May, 21:56 (IST)

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 5797 गुन्हे दाखल; आतापर्यंत 2601आरोपींना अटक तर, 15 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. एएनआयचे ट्वीट-

 

 

19 May, 21:24 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आज 1 हजार 411 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

19 May, 21:00 (IST)

सुरुवातीला कोविड 19 रूग्णांना ठेवण्यासाठी पलंगाची काही कमतरता जाणवली परंतु आता आम्ही तयार आहोत असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. एनएससीआय डोम, एमएमआरडीए मैदान आणि इतर ठिकाणी व्यवस्था केल्यावर आता कोविड रूग्णांसाठी  15000 बेड्स आणि आयसीयूसाठी 2000 बेड उपलब्ध आहेत असेही टोपे यांनी म्हंटले आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातील 80% बेड सुद्धा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विचार आहे.

19 May, 20:21 (IST)

घाटकोपर येथील पंत नगर भागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर 'समोसा पार्टी' आयोजित करून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षाचे संयोजक यांना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती  मुंबई पोलिसांनी दिली आहे.

19 May, 19:43 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 2100 नवे रुग्ण आढळले आहेत, यानुसार राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या 37,158 वर पोहचली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

19 May, 19:29 (IST)

मुंबईतील धारावीत आज 26 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानुसार आजवर कोरोनाचे एकूण 1,353 धारावी मध्ये आढळले आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. 

 

19 May, 19:06 (IST)

देशात एका दिवसात 1,08,233 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 24,25,742 नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्या आहेत. यापैकी 1  लाख 11 हजार 39 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

19 May, 18:48 (IST)

पश्चिम बंगाल मध्ये अम्फान चक्रीवादळाची चाहूल लागली असून आज संकध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दिघा या भागात हा जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार उद्या अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल मध्ये धडकण्याची  शक्यता आहे.

Load More

महाराष्ट्रामध्ये आज सकाळी एका अपघातामध्ये 4 स्थलांतरित मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सोलापूर कडून झारखंडच्या दिशेने प्रवास करणार्‍या ट्रकचा यवतमाळ नजिक अपघात झाला. ट्रक आणि बसच्या धडकेमध्ये बसमधील 15 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांना सबुरी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्थलांतरित मजुरांची त्यांच्या मूळ गावी नेण्याची योग्य व्यवस्था केली जाईल असा विश्वास त्यांनी सरकारच्या वतीने दिला आहे.  न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांनी 11 मे दिवशी अर्णब यांच्या विरोधातील  निकाल राखीव ठेवला होता. यामध्ये पालघर मॉब लिंचिंग सोबतच वांद्रे स्थानकाबाहेरील मजुरांच्या गर्दी प्रकरणाचा समावेश होता.

दरम्यान मुंबईकरांना देखील आता पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. 18 मे पासून लॉकडाऊन 4 सुरू झालं आहे. अद्याप राज्यात रेड झोनला सवलती देण्यात आलेल्या नाही त्यामुळे विनाकारक गाड्या घेऊन रस्त्यावर फिरणं टाळा. अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असे सांगण्यात आलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सध्या राज्यांराज्यामध्ये वाहतूकीला परवानगी आहे. स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. देशभरात कोरोना बाधितांचा सध्या एक लाखाच्या जवळ पोहचला आहे. महाराष्ट्रातही काल सलग दुसर्‍या दिवशी 24 तासामध्ये 2 हजारापैक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.


Show Full Article Share Now