Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 28, 2025
ताज्या बातम्या
42 minutes ago

'पालघर येथील गुन्ह्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल'- सीएम उद्धव ठाकरे यांचे आश्वासन; 19 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Apr 19, 2020 11:54 PM IST
A+
A-
19 Apr, 23:53 (IST)

पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सीएम उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

19 Apr, 23:30 (IST)

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत संपूर्ण क्षेत्र आज दि. 20 एप्रिल मध्यरात्री पासून 27 एप्रिलपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.

19 Apr, 22:52 (IST)

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतर्गत, आयुष्मान भारतच्या एका उच्च अधिकाऱ्याच्या सचिवांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील लोक नायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

19 Apr, 22:01 (IST)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये लॉकडाऊन 7 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याबाबत माहिती दिली.

 

19 Apr, 21:36 (IST)

पालघर येथे 17 एप्रिल रोजी चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी 3 जणांना मारहाण केली होता, आता या तिघांचाही मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांविरोधात एफआयआर दाखल केला असून, 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 101 जणांना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि 9 अल्पवयीन मुलांना अल्पवयीन निवारा गृहात पाठविण्यात आले आहे.

19 Apr, 21:18 (IST)

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील स्वच्छताग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढीची मागणी मान्य करण्यात आली आहे. आता 30 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या नियुक्त्या करता येणार. ग्रामीण भागातील जनता, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून स्वच्छताग्रही काम करतील. 

19 Apr, 20:43 (IST)

महाराष्ट्रात आज 552 नवे कोरोनाचे रुग्ण तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4200 वर तर 223 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 507 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

19 Apr, 20:30 (IST)

गुजरात येथे नवे 139 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 1743 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

19 Apr, 20:08 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे नवे 135 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2798 वर आणि 131 जणांचा बळी गेला आहे. तर 310 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

19 Apr, 19:42 (IST)

नागपूरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 192 जणांचा शोध त्यापैकी  11 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण 144 जणांच्या रिपोर्ट्सची वाट पाहत असल्याचे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. तसेच आज नागपूरात 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

Load More

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरात 3  मे पर्यंत जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा अर्थव्यवस्थेवर चिंताजनक परिणाम होताना दिसत आहे. अनेक व्यवसाय बंद असल्याने सद्य घडीला राज्याचे (महाराष्ट्र) उत्पन्न शून्यावर आले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आता आंब्याच्या सीझनचे महत्वाचे आठवडे हे देखील ग्राहकांच्या शिवाय जात असल्याने एक महत्वाचा व्यवसाय सुद्धा तोट्यात सुरु आहे, याबाबत नाशिक व रत्नागिरी येथील आंबा विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे उद्या 20 एप्रिल पासून देशातील काही उद्योग व्यवसाय हे पुन्हा सुरु केले जाणार आहेत, त्यामुळे हे थांबलेले अर्थचक्र पुन्हा निदान सुरु होईल आणि हळूहळू रुळावर येईल अशी अपेक्षा आहे. उद्योग सुरु होणार असले तरी 3 मे पर्यंत ट्रेन आणि विमानसेवा पूर्णतः बंद असतील.

महाराष्ट्रात आता कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत (148 ) आणि पुणे शहरात (78 ) आढळून आले आहेत. तर भारतात रुग्णांची संख्या ही 15 हजार 707 वर पोहचली आहे. यापैकी 507 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सध्या देशात 12 हजार 696 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 2231 रुग्णांना बरे करण्यात वैद्यकीय विभागला यश आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे. तर कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 23 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे 1,867 बळी गेले आहेत. ज्यामुळे आतापर्यंतचा कोरोना मृतांचा आकडा हा 39 हजार 14 झाला आहे. तर कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 7  लाख 39 हजारांवर पोहोचली आहे.


Show Full Article Share Now