Coronavirus Update: देशात कोरोना रुग्णांची संख्या 26 लाखाच्या वर, 24 तासात 57,982 नवे रुग्ण, 941 जणांंचा मृत्यु, पहा आकडेवारी
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Updates In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) माहितीनुसार मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत 57,982 रुग्णांची वाढ झाली आहे. यानुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus Cases) 26,47,664 वर पोहचली आहे. कालच्या दिवसभरात 941 मृत्युंची नोंद झाली असुन आजवर एकुण 50,921 जणांंचा कोरोनाने बळी (COVID 19 Fatality) घेतला आहे. या मध्ये दिलासादायक माहिती अशी की, आजवर देशात 19,19,843 रुग्णांनी कोरोनावर मात (Coronavirus Recovered) केली आहे. तर अवघ्या 6,76,900 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर (Active Coronavirus Cases) उपचार सुरु आहे. देशात कोरोना रिकव्हरी रेट हा 65 % च्या वर असुन मृत्युदर हा 2 % हुन कमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आजवर देशात एकुण कोरोनाच्या 3 कोटीहुन अधिक चाचण्या झाल्या आहेत, 16 ऑगस्ट पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास 3,00,41,400 इतक्या आजवर कोविड चाचण्या झाल्या आहेत. यातील 7,31,697 चाचण्या तर केवळ कालच्या दिवसभरात पार पडल्या आहेत.

ANI ट्विट

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा कोविड-19 मृत्यू दर कमी आहे. तुलनेने पाहायला गेल्यास अमेरिकेत (USA) 23 दिवसांत 50,000 मृत्यू झाले होते. तर ब्राझील (Brazil) मध्ये 95 आणि मॅक्सिको (Mexico) मध्ये 141 दिवसांत मृतांचा आकडा 50,000 झाला होता. मात्र यासाठी भारताला 156 दिवस लागले आहेत.

दरम्यान, रशियाच्या (Russia) आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोविड-19 (Covid-19) विरुद्धच्या लढाईमध्ये जगातील सर्वात पहिली लस Sputnik V च्या पहिल्या बॅचचे उत्पादन करण्यात आले आहे, तर भारतातही तीन कोरोनावरील लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.