Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
37 minutes ago

झारखंड येथे आज 733 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर, 8 जणांचा मृत्यू; 17 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Aug 17, 2020 11:52 PM IST
A+
A-
17 Aug, 23:52 (IST)

झारखंड येथे आज 733 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 67 वर गेली आहे. यापैकी 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 हजार 348 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

17 Aug, 22:57 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 835 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 74,933 झाली आहे. तर 1,049 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,64,444 झाली असून आज 4,635 टेस्ट घेण्यात आल्या.

17 Aug, 22:42 (IST)

वांद्रेच्या शेर्ले राजन रोडवर कोसळलेली इमारत रिकामी होती, मात्र इमारत कोसळल्याने त्याचा भाग जवळच असलेल्या इतर इमारतींवर पडला. यातून एका व्यक्तीची सुटका करण्यात यश आले असून, बचावकार्य चालू आहे.

17 Aug, 22:28 (IST)

अधिवेशनापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेच्या वीस सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती सभापतींनी दिली.

17 Aug, 22:08 (IST)

केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातील मंडुआडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'बनारस' ठेवण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मिळत आहे.

17 Aug, 21:43 (IST)

पालघर: नांदोलिया सेंद्रीय रसायनांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिली आहे.

17 Aug, 21:31 (IST)

भुवनेश्वर: ओडिशाच्या जीएसटी अंमलबजावणी पथकाने 712 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करण्यात गुंतलेल्या जीएसटी रॅकेटच्या किंगपिनला अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.

17 Aug, 20:54 (IST)

कृष्णा नदीच्या येथे न जाण्याचा सुचना देऊन सुद्धा नागरिक गेल्याने स्पेशल टास्क फोर्सने दिली उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. 

पहा व्हिडिओ:

17 Aug, 20:41 (IST)

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1,29,479 वर पोहचला असून आज 753 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

17 Aug, 20:34 (IST)

पालघर मधील नांदोलिया ऑर्गेनिग केमिकल्सला भीषण आग लागली आहे.

Load More

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, अनलॉक असे नवनवे आजार, प्रयोग आणि उपाययोजना दर्शवणारे शब्द आता जनतेला माहित आणि पाटही झाले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊमुळे घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर कशी आणायची याबाबत देशातील प्रत्येक नागरिक चिंतेत आहे. त्याचप्रमाणे ही चिंता राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन आणि कोरोनाचे मळभ पूर्णपणे कधी हटणार याकडे सर्वसामान्य जनता लक्ष डोळे लाऊ आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची पहिलीच लाट आहे. दुसरी लाट अजून आली नाही. योग्य खबरदारी घेऊन दुसरी लाट येऊच द्यायची नाही यासाठी राज्य सरकार काम करते आहे. त्यामुळे राज्यातील टाळेबंदी उठवण्याची घाई नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी जगभरातील काही देशांची त्यांनी उदाहरणेही दिली आहेत. अमेरिकेत काही ठिकाणी शाळा सुरु केल्या. त्यानंतर शाळेतही करोना व्हायरस प्रादुर्भाव झाला. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचेही ते म्हणाले.

देशात कोरोना व्हायरस संकट, उपाययोजना आणि आर्थिक घसरण यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यासोबतच आणखी एका मुद्द्यावरुन देशातील राजकारण तापले आहे. याला सोशल मीडिया विश्वातील सर्वात मोठा मंच फेसबुक कारण ठरले आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तत म्हटले आहे की, भाजप नेत्याने लिहिलेल्या द्वेशमुलक मजकूराकडे फेसबुकने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या वृत्तानंतर देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संकट सुरु असताना प्रदीर्घ काळ लांबणीवर पडलेले संसदेचे अधिवेशन बोलावण्याची तयारी झाली आहे. संसदेचे विशेष पावसाळी अधिवेशन लवकरच बोलावले जाण्याची शक्यता आहे. संसद सदस्यांना लोकसभा अधिवेशनात सहभागी होता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभा उपसभापती व्यकंय्या नायडू यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले आहे. काही ठिकाणी हलका, मध्यम, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक, प्रादेशिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटना घडामोडींचा ताजा तपशील आणि ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलले राहा.


Show Full Article Share Now