तामिळनाडू येथे आज आणखी 451 कोरोनाबाधितांची नोंद; 16 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Feb 16, 2021 11:38 PM IST
काल देशभरात माघी गणेशोत्सव जयंती पार पडल्यानंतर आज सर्वत्र वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. तर वाराणसीतील पवित्र अशा गंगा नदीत वसंत पंचमी निमित्त स्नान करण्यासाठी भाविक एकत्रित आले आहे. त्याचसोबत राष्ट्रापती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी जनतेला वसंत पंचमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये प्रति लीटर (30 पैशांनी वाढ) तर डिझेल 79.90 रुपये प्रति लीटर (35 पैशांनी वाढ) झाले आहे.
तसेच महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना मुंबई-पुणे महामार्गावर घडली आहे. काल जळगाव मध्ये झालेल्या अपघातानंतर आजच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही गाड्यांमध्ये टक्कर होत हा अपघात झाला असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आणि डान्सबार बंदी यशस्वीपणे अंमलात आणून महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण करणारे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व ग्रामविकास मंत्री स्व.आर आर.पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.