आसाम येथे आज 1 हजार 317 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 76 हजार 875 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

   

माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक आहे. चेतन चोहान हे उत्कृष्ट क्रिकेटपटूसह चांगले राजकीय नेतेही होते. पीटीआयचे ट्वीट- 

 

पश्चिम बंगालमध्ये आज तब्बल 3 हजार 66 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 51 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

मध्य प्रदेशमध्ये आज 1,022 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हरियाणामध्ये आज 743 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रात आज 11,111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 288 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये आज 8,012 नव्या कोरोना संक्रमितांची भर पडली असून 88 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

चेतन चौहान यांनी उत्तर प्रदेशच्या जनसेवेत आणि भाजपाला बळकट करण्यासाठी प्रभावी योगदान दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

धारावीत आज 5 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2668 वर पोहोचली आहे.

 

Load More

माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former PM Atal Bihari Vajpayee) यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी (2nd Death Anniversary) निमित्त त्यांचे स्मारक 'सदैव अटल' (Sadaiv Atal) येथे आज सकाळपासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु, संरक्षण मंत्री राजनाथ सिंंह यांंच्यासह अनेक बड्या नेत्यांनी भेट दिली आहे. 16 ऑगस्ट 2018 ला अटल बिहारी वाजपेयी यांनी 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.

दुसरीकडे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी वॉशिंग्टन डी.सी. मेट्रो क्षेत्रात भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ड्राइव्ह-थ्रू इव्हेंट आयोजित केले आहेत, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगवर सुद्धा भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात रोषणाई करण्यात आली आहे. वेळेच्या फरकानुसार आज अमेरिकेत भारताचा स्वातंंत्र्य दिन साजरा केला जात आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान पावसाचा आढावा पाहायला गेल्यास आज मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असुन हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसात झालेल्या तुफान पावसामुळे कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.