Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

पुण्यात मुसळधार पावसामुळे इंदापूरच्या अनेक भागांत वॉटर लॉगिंगची समस्या ; 14 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Oct 14, 2020 11:56 PM IST
A+
A-
14 Oct, 23:55 (IST)

पुण्यात मुसळधार पावसामुळे इंदापूरच्या अनेक भागांत वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली आहे.

14 Oct, 23:24 (IST)

IPL 2020: बुधवारी दुबईमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सला 13 धावांनी पराभूत केले.

14 Oct, 23:02 (IST)

पुणे जिल्ह्यातील पूर बाधित निमगाव केतकी गावात 40 जणांचा वाचवण्यात यश मिळाले आहे, तर इतर 15 जणांच्या बचावाची कामे सुरू आहेत. इंदापूरजवळील आणखी एका घटनेत वाहनासोबत वाहून गेलेल्या दोन जणांना वाचविण्यात यश आले आहेः एसडीओ, बारामती, पुणे यांनी याबाबत माहिती दिली.

14 Oct, 22:02 (IST)

सपा नेते मुलायम सिंह यादव यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या तरी त्यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

14 Oct, 21:27 (IST)

नवी दिल्लीत आज दिवसभरात 3324 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या  3,17,548 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5898 इतका झाला आहे.

14 Oct, 20:11 (IST)

महाराष्ट्र: मध्य रेल्वे उद्यापासून विशेष उपनगरी सेवांची संख्या वाढवत आहे. ही संख्या आता 453 वरून 481 वर नेली आहे.

14 Oct, 19:47 (IST)

राज्यात आज 10,552 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19,517 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 13,16,769 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,96,288 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.71% झाले आहे.

14 Oct, 18:55 (IST)

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे पांडुरंग कोरे विजयी झाले. भाजपा उमेदवार पांडुरंग कोरे यांना 9 तर काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांना 7 मते मिळाली.

14 Oct, 18:44 (IST)

थुलम या मल्याळम महिन्यात 16 ऑक्टोबरपासून 5 दिवस सबरीमाला मंदिर पूजेसाठी खुले असेल. दररोज केवळ 250 लोकांना दर्शनासाठी परवानगी असेल आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसीसवर ऑनलाइन बुकिंग केले जाईल. इथे येण्यासाठी कोविड नकारात्मक प्रमाणपत्र अनिवार्य असेल, त्रावणकोर देवासोम बोर्डाने याबाबत माहिती दिली.

14 Oct, 18:28 (IST)

पुणे पोलिसांनी एका नवजात मुलाचा मृतदेह चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. पालकांनी त्याला ठार मारल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.

Load More

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसंच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, सोमवारी संपूर्ण वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातापाताची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

राज्यात 13 ते 17 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशात कोरोना व्हायरसचे संकट कायम असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. देशातील मृत्यूदर जगात सर्वात कमी असून रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

उत्तर प्रदेशात बलात्काराचे सत्र संपायचे नाव घेत नाही. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हाथरस येथील सासनी परिसरात एका 4 वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

You might also like


Show Full Article Share Now