मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बांग्लादेशींविरोधात एल्गार पुकारलेला असताना, ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चार बांग्लादेशींना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. त्यांच्याकडे बांग्लादेशचा पासपोर्ट सापडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

केइएम रुग्णालयातील रुग्णांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, इम्पॅक्ट गुरू सोबत एकत्र येऊन 'हेल्थ केअर क्राऊड फंडिंग' हा उपक्रम राबवणार आहेत. जनतेने जनतेसाठी उभी केलेली रकम मुंबईतील आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करेल असा बीएमसीला विश्वास आहे. 

भंडारा जिल्ह्यातील ‘आयटीआय’चा कायापालट होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी नेत नवाब मलिक यांनी निर्णय घेतला आहे.

 

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या वित्तमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनक यांना आपल्या मंत्रिमंडळात ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.  ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.   

भाजप पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषयुक्त वक्तव्यामुळे भाजपाला त्रास सहन करावा लागला, असं मत भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला फक्त 8 जागांवर विजय मिळवता आल्या. दिल्ली विधानसभा प्रचारावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी द्वेषयुक्त वक्तव्य केले होते. याचा मोठा परिणाम भाजपवर झाला असल्याचे अप्रत्यक्षपणे अमित शहा यांनी सांगितलं आहे. 


 

मुंबईतील डबेवाल्यांना लवकरच आपल्या हक्काचं घर मिळणार आहे. आज  मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

राणीच्या बागेत आता करिष्मा आणि शक्ती या वाघांची डरकाळी ऐकू येणार आहे. औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातून करिश्मा (मादी) आणि शक्ती (नर) हे दोन वाघ राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत. त्यामुळे राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांना हे वाघ जवळून पाहता येणार आहेत. 

मराठीत चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' उभारणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावे तसेच मराठीत येत असलेल्या दर्जेदार चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी, यासाठी ही मिनी चित्रपटगृह उभारण्यात येणार आहेत.  

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल क्लार्कने आपली पत्नी कायलीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर क्लार्कने हा निर्णय घेतला आहे. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे क्लार्कने आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.  

मुंबईतील नागपाडा जंक्शन परिसरात नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाचा तुकडा पडला आहे. जनार्दन साखरे, असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून तो नागपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. साखरे यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मिड-डे या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे.   

Load More

आज, 13 फेब्रुवारी हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे, सांगली (Sangali)  येथील काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील (Sadashiv Patil)  आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेणार असल्याचे समजतेय, तर वंचित बहुजनचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांनी सुद्धा आपण 12 एप्रिल रोजी राष्ट्रवादी  प्रवेश घेणार असल्याची घोषणा केलेली आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कमाल कामगिरी करून दाखवली याच विश्वासाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Vidhansabha Elections) सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने काही उमेदवार उभे केले होते, मात्र या सर्व उमेदवारांना नोटाहूनही कमी मते मिळाल्याने पक्षाची काहीशी निराशा झाली होती.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या नव्या भूमिकेसह आज पहिल्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 57 ते 70 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी मनसेकडून केली जाणार आहे. त्या तयारीचा भाग म्हणून 13 ते 16 फेब्रुवारी या तीन दिवसात राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी असणार आहेत. काही काळापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात होता, याबाबत काल आमदार राजू पाटील यांनी माहिती दिली.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

दरम्यान राष्ट्रीय स्तरावर, काल केंद्र सरकडून विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली, तब्बल 145 रुपयांच्या दर वाढीमुळे महानगरात गॅसच्या किंमती या 850 च्या घरात गेल्या आहेत, या दर वाढीच्या विरुद्ध आज काँग्रेस महिला कार्यकर्त्यांकडून बंदा ची हाक देण्यात आली आहे.