Mumbai Crime: मुंबईतील चेंबूर येथे एका 12 वर्षाच्या मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतापजनक म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांच्या फोनवर एका अज्ञाताने लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओत मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे दिसून आल्याने वडिलांना धक्काच बसला. व्हिडिओमुळे ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत या संदर्भात तक्रार दाखल केली. (हेही वाचा- लग्नाला नकार दिल्याने तरुणीच्या चेहऱ्यावर रॉडने लिहलं नाव, आरोपी फरार
अधिक माहितीनुसार, चेंबूर परिसरातील एका २२ मजल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या टॉवरमध्ये ही घटना घडली. चार मुलांनी पीडितेला 21 एप्रिल रोजी काही निमित्ताने टेरेसवर घेऊन गेले. टेरेसवर एका कोपऱ्यात चार मुलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. मुलीला या घटनेची माहिती कोणाला न सांगू नकोस अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी फरार घटनास्थळावरून झाले.
शुक्रवारी २६ एप्रिल रोजी वडिलांच्या फोनवर व्हिडिओ आल्यानंतर या घटनेची पीडित मुलीला विचारणा केली. त्यानंतर मुलीने सांगितले की, चार जणांनी जबरदस्ती केल्याचे सांगितले. गुरुवारी रात्री वडिल मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले आणि बालसुधारगृहात पाठवले. आरोपी 15, 13, 14 आणि 16 वर्षे वयोगटातील आहे.
मुलांच्या सुधारणेसाठी त्यांना समुपदेशन करण्यात येईल. पीडित मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही. मुले चेंबुर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी मुलांचा मोबाईल जप्त केला आहे. मुलांवर गुन्हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.