मकर संक्रांती निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरातील तयारीचा घेतला आढावा; 12 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jan 12, 2021 11:17 PM IST
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून आज कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. यासाठी तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. हे डोस विमानाच्या साहाय्याने देशभरात पाठवण्यात येणार आहेत.
सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, कोरोना योध्ये तसेच 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. आज पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात ही लस पाठवली जाणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आज सकाळी 10 वाजता वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणता आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.