'जेट एअरवेज' ची उड्डाणे सोमवार पासून थांबवणार, कर्मचाऱ्यांचे वेतन थकवल्यामुळे 1100 वैमानिकांनी घेतला निर्णय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप पर्यंत थकवल्यामुळे सोमवारी (15 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून उड्डाणे थांबविण्याचा निर्णय जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये 1100 वैमानिकांचा सहभाग आहे. तर इंजिनिअर, व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी यांना जानेवारी महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नसल्याचे त्यांनी त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कर्जामुळे डबघाईला गेलेल्या जेट एअरवेज कंपनीने मार्च महिन्याचेसुद्धा वेतन कर्मचाऱ्यांना दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला वेतन मिळेल की नाही याची शंका कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणून उद्यापासून जेटची उड्डाणे आम्ही थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. नॅशनल एविएटर्स गिल्डशी संबंधित असलेले कर्मचारी उद्यापासून उड्डाणे बंद करणार असल्याचे गिल्डकडून सांगण्यात आले आहे.(हेही वाचा-'जेट एअरवेज'ने रद्द केली सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे; कंपनीकडे केवळ 14 विमाने शिल्लक)

तसेच जेटचे संस्थापक नरेश गोयल यांनी सुद्धा संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. वेतन न मिळाल्या कारणामुळे एप्रिल महिन्यापासून उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 31 मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी आंदोलन 15 एप्रिल रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे.