Encounter प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य -X/ @modified30)

Manipur Encounter: मणिपूर (Manipur) मध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. मणिपूरमधील जिरीबाम भागात (Jiribam Area) सीआरपीएफ (CRPF) सोबत झालेल्या चकमकीत (Encounter) 11 संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, कॅम्पवर हल्ला केल्यानंतर सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला. जखमी जवानाला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी 2.30 च्या सुमारास, अतिरेक्यांनी बोरोबेकरा पोलिस स्टेशनच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या आणि जाकुराडोर करोंगच्या दिशेने जात असताना गोळीबार केला.

जाकुराडोर करोंग परिसर बोरोबेकरा पोलीस ठाण्यापासून जवळ आहे. जवळच एक मदत शिबिरही आहे. जूनमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून बोरोबेकरा उपविभागात अनेक हल्ले आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. हा भाग जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित भागांपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात, सशस्त्र हल्लेखोरांनी जयरोन हमर गावात हल्ला केला. ज्यामुळे 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा -Srinagar Encounter: श्रीनगरमधील झाबरवान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू; सुरक्षा दलाचे जवान जखमी (Watch Video))

इम्फाळमध्ये शेतकरी जखमी -

इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सोमवारी सकाळी जवळच्या टेकड्यांवरून अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शेतात काम करणारा शेतकरी जखमी झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यांमुळे खोऱ्याच्या सीमेवर राहणारे अनेक शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत आणि याचा परिणाम भात पिकाच्या काढणीवर होत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबाराची घटना सकाळी 9.20 च्या सुमारास घडली. शेजारच्या कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातील अतिरेक्यांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील यानगांगपोकपी शांतीखोंगबान भागात भातशेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला.