Mumbai Police: नौदल अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक- मुंबई पोलीस; 11 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Sep 11, 2020 11:46 PM IST
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथे 7 सप्टेंबर रोजी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यावर )Indian Army) गोळीबार करून जवळील सुकनाग नाल्यामध्ये (Suknag Nala) दहशतवाद्याने उडी घेतली होती. या चकमकीत त्याच्या गळ्याला गोळी लागली होती. या दहशतवाद्याचा मृतदेह आज सकाळी सुकनाग नाल्यातून आढळला असून भारतीय सैन्याने तो मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यामुळे ही शोधमोहीम संपली असून अधिक तपास सुरु असल्याचे भारतीय सैन्य दल विभागाने सांगितले.
एकीकडे भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढत आहे तर दुसरीकडे संपूर्ण भारत कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात मोठी लढाई लढत आहे. भारतात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत आजवरची सर्वात मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. 95,735 नव्या रुग्णांसह देशात एकुण कोरोनाबाधितांचा आकडा थेट 44,65,864 (COVID-19 Positive Cases) वर पोहचला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या (Coronavirus Cases In Maharashtra) काल (9 सप्टेंबर) काहीशी स्थिर राहिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभरात 23,446 नवे कोरोना व्हायरस (COVID 19) संक्रमित आढळले. तर कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित 448 जणांचा मृत्यू झाला.