Live
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन; सुभाष देसाई यांनी वाहली श्रद्धांजली;11 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Jan 11, 2021 11:49 PM IST
भारतामध्ये 16 जानेवारी पासून कोविड 19 च्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान कोविडच्या काळातही वाढती रूग्णसंख्या, सोयी-सुविधा यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली होती. आता लसीकरण सार्यांसाठीच मोफत असणार का? हा एक मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये कोविड योद्धे आणि डॉक्टर्स यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ही लस मोफत उपलब्ध असेल. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरातील लोकांना ती लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी देशात 2 ड्राय रन देखील झाल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोविडची परिस्थिती आटोक्यात येतानाचं चित्र असतानाच आता बर्ड फ्लू ची भीती वाढत आहे. देशात कावळे, बगळे, कोंबड्या यांच्या मृत्यूची प्रकरण वाढत आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रही बर्ड फ्लू च्या सावटाखाली आहे. अद्याप अधिकृतरित्या बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याची बाब सांगण्यात आलेली नाही.