आजचा 'व्हेलेंटाईन डे' (Valentine's Day) स्पेशल करण्याच्या नादात तरुणाई असताना गुजरातमधील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी एक अनोखी शपथ घेतली आहे. 'व्हेलेंटाईन डे'च्या निमित्ताने आई-वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ गुजरातमधील शालेय विद्यार्थ्यांनी घेतली आहे. यात तब्बल 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बाल मनोरोगतज्ञ डॉ. मुकूल चोक्सी यांनी लिहिलेल्या कवितेद्वारे ही शपथ देण्यात आली. म्हणून '14 फेब्रुवारी'ला साजरा केला जातो व्हेलेंटाईन डे!
पालकांच्या आज्ञेचं पालन करावं आणि त्यांच्या परवानगी शिवाय लग्न न करण्याची शपथ या कार्यक्रमात घेण्यात आली. हा कार्यक्रम सुमारे 15 शाळा-कॉलेजेस मध्ये आयोजित करण्यात आला होता. हसीमदेव जयते नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेद्वारे हा कार्यक्रम हशा थेरपिस्ट कमलेश मसालावाला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बजरंग दलाने व्हेलेंटाईन डे दिवशी जोडप्याचे जबरदस्तीने लावले लग्न, हैदराबाद येथील घटना (Video)
मसालावाला यांनी सांगितले की, "अनेक तरुण-तरुणी जोडीदार निवडीचा निर्णय अगदी घाईघाईत, प्रेमाच्या आवेगात, सारासार विचार न करता घेतात. पण पालकांच्या परवानगीने लग्न करणे अधिक हिताचे ठरेल." पुढे ते म्हणाले की, "मी प्रेम किंवा प्रेमविवाहाच्या विरोधात नाही. मात्र लग्नासंदर्भातील समस्या घेऊन माझ्याकडे अनेक मुले येतात. त्यातूनच मला ही संकल्पना सुचली."