आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जवर 37 धावांनी विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सलग पाचवा पराभव; रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 37 धावांनी विजय; 10 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध राजकीय नेत्यांनी रामविलास पासवान यांच्या निधनाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आज रामविलास पासवान यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तर केंद्रीय कायदा आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद हे पाटणा येथे पार पडण्याऱ्या अंत्यसंस्कारावेळी केंद्र सरकारच्या वतीने प्रतिनिधत्व करणार आहेत. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर रामविलास पासवान यांना निवासस्थाहन जर्नादन घाट येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार आहे.
दुसऱ्या बाजूला बिहार मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज प्रकिया आता पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 71 जागांवर एकूण 1057 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. कोरोनाच्या काळात पार पडणाऱ्या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास राजकीय पक्षाच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा ही दिला गेला आहे.
याच दरम्यान, सध्याची देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध मार्गाने उपाय योजना केल्या जात आहेत. तर लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असून विविध टप्प्यातील अनलॉकिंग नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 5 ऑक्टोंबर पासून रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल्स सुरु झाले आहेत. येत्या 15 ऑक्टोंबर पासून शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र विविध राज्यातील प्रशासनाने तेथील कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास देशातील कोविड19 चा आकडा 69 लाखांच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्रात 14 लाखांच्या पुढे कोरोनाग्रस्तांची संख्या आहे.
नक्की वाचाच
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा