उद्यापासून 'या' पाच गोष्टींचे नियम बदलणार, नागरिकांच्या आयुष्यावर थेट प्रभाव पडणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

उद्या 1 जूनपासून बँकिंग, पेट्रोल, घरगुती गॅस यांसारख्या महत्वाच्या गोष्टींसाठीच्या नियमात बदलाव होणार आहे. या बदलावामुळे त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर पडणार आहे.

तसेच बदलत्या नियमानुसार आरबीआयकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवणे, घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आणि व्याजदर संबंधित काही गोष्टी बदलणार आहेत.

- घरगुती गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता

1 जून पासून घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मे महिन्यात एलपीजीचे दर वाढवण्यात आल्याने त्याचा सामान्यांना फटका बसला होता. तर विनाअनुधारक सिलेंडरसाठी दर 6 रुपयांनी वाढवले होते.

-पैसे ट्रान्सफरसाठी RBI कडून नियमात बदल

उद्यापासून आरटीजीएस (RTGS) करण्यासाठी वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी आरटीजीएस करण्यासाठी 4 पर्यंतची वेळ देऊ केली होती.

(Railway Recruitment 2019: खुशखबर! भारतीय रेल्वेत सुरु झाली नोकरभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा)

-EMI कमी होणार

आरबीआयकडून व्याजदरात कपात होणार आहे. तर द्वै मासिक धोरणाची घोषणा 6 जून रोजी होण्याची शक्यता आहे.

-हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही

दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही. तर रस्ते सुरक्षेसंबंधित नागरिकांमध्ये जागृकता निर्माण होण्यासाठी हा नियम सुरु करण्यात आला आहे. परंतु हा नियम उत्तर प्रदेश मधील नोएडा आणि ग्रेटर नोएडा यांच्यासाठी लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी उद्यापासून बदलणाऱ्या या नियमांकडे लक्ष द्यावे. तसेच विविध क्षेत्रात झालेल्या बदलावांमुळे त्याचा परिणाम थेट सामान्याच्या आयुष्यावर होणार असून त्याचा फायदा की तोटा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.