Navjot Singh Sidhu Jail: रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास; 33 वर्ष जुन्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Navjot Singh Sidhu (PC - Twitter)

Navjot Singh Sidhu Jail: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी (Road Rage Case) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टाने रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योतसिंग सिद्धूच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलिस ताब्यात घेतील. आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत सिद्धूला शिक्षा सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा - Hardik Patel On Congress: काँग्रेस हा सर्वात मोठा जातीवादी पक्ष, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा अद्याप निर्णय नाही - हार्दिक पटेल)

काय आहे नेमकी प्रकरण?

पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झाले होते. ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला 50० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

आयपीसीचे कलम 323 काय आहे?

भारतीय दंड संहितेच्या कलम 323 नुसार, जो कोणी जाणूनबुजून स्वेच्छेने एखाद्याला दुखावतो. त्याला जास्तीत जास्त एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. अपराध्यास एक वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिली जाईल.