
Bihar Shocker: बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात बुधवारी काही गुंड्यांनी घरात घुसुन अंदाधुंद गोळीबार केला. एका महिलेसह चार जणांना गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर आरोपी दुचाकीवरुन पळून गेला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार ही घटना जाजूआर गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. दसऱ्या निमित्त गावत जत्रा होती त्यावेळी काही मुद्यावरून दोन लोकांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी देखील झाली होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दोघांमधील वाद संपवला. मात्र त्याच रात्री एकाने गावात बंदुकीसह घरात घुसुन अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले.
गोळीचा आवाज ऐकताच, शेजारच्यांनी घराकडे धाव घेतला, आरोपी घटना स्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे एकाची प्रकृती गंभीर आहे, पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेअंतर्गत पोलिस आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहे. तीन आरोपींची ओळख अद्यापही पटली नाही.